Harishchandragad Update 10.7.2019 (marathi)

 Save as PDF

हरीचंद्रगडावर किव्हा त्या परिसरात येताय तर कृपया लक्ष द्या
सर्व ट्रेकर,पर्यटक,निसर्गप्रेमी, यांना कळवण्यात अत्यंत आनंद वाटतोय कि ग्रामपंचायत, वन विभाग, वन व्यवस्थापन समिती आणि गावकरी सर्वांनी एकत्र येऊन एक मोठा निर्णय घेतला आहे

हरीचंद्रगडाचे पावित्र्य राखण्यासाठी व अतिउत्साही, मद्यपान व धांगडधिंगा करून पर्यावरण दुषीत करणा- या पर्यटकांवर आळा बसण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती पाचनई ग्रामपंचायत व वनविभाग राजूर यांच्या मार्फत पाचनई येथे टोलनाक्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी गावच्या विकासासाठी व पर्यावरणाच्या काळजीपोटी व गावातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. उपद्रव शुल्क, पार्किंगच्या माध्यमातून जमा होणा-या निधीचा विनियोग टोलवर काम करणारे कामगार, सुरक्षा दल,प्लास्टिक व कचरा व्यवस्थापन कामातील कामगार व इतर पैसा गाव विकास व परीसर सुशोभीकरण यावर खर्च करण्यात येत आहे. व्हेकल्स चेक करूनच सोडल्या जाणार असून दारूबंदी आहे जर कुणी मद्यपी धांगडधिंगा करत असेल, अरेरावी करत असेल किंवा
पर्यावरणाचा – हास करताना पकडला गेला तर त्यांच्यावर सं.व.व्य. समिती पाचनई ,वनविभाग राजूर
व राजूर पोलीस स्टेशन मार्फत कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्या ही प्रकारचे समितीमध्ये गैर व्यवहार केले जाऊ नयेत म्हणून तिकिट दिले जाईल प्रत्येकाने आपण भरलेल्या शुल्काची रीतसर पावती घ्यावी, तसेच टोल माफी फक्त स्थानिक गाव मौजे पाचनई पेठेचिवाडी यांनाच देण्यात आली आहे. याबाबत वनविभाग राजूर वतिने विशेष काळजी घेण्यात आली आहे. तसेच पर्यटकांना येथील हातसडीचा तांदूळ, रानभाज्या, मद अशा अनेक सेंद्रिय पद्धतीच्या अन्नधान्य व भाजीपाला विकत घेता येईल अशि व्यवस्था येणाऱ्या काळात समितीमार्फत करण्यात येणार आहे. शिस्तबध्द पध्दतीने पर्यटन म्हणुन हरीचंद्रगड पुढे येउन एक आदर्श पर्यटन व व्यवस्था माॅडेल रूपात नेण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती पाचनई व वनविभाग राजूर विशेष प्रयत्नशील राहणार आहे या साठी प्रत्त्येक येणाऱ्या पर्यटकांनी मदत करण्याचे आव्हान ही पाचनई ग्रामस्थ व वनविभाग राजूर यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. मौजे पाचनई ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन हा घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. कारण सध्या पर्यटनस्थळांचा -हास झपाट्याने होत असुन तेथील पर्यावरण संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे व हा अमुल्य ठेवा जर जतन केला गेला नाही तर याचा परिणाम येथील स्थानिकांना तर भोगावा लागेलच परंतु या सोबत जागतिक तापमान वाढीमुळे
सर्व जगालाही तो भोगावा लागेल म्हणून मित्रांनो पाचनई ग्रामस्थांनि हा निर्णय घेतला आहे,दुखः खिशातील दोन पैसे जातील म्हणून करत बसण्यापेक्षा मित्रांनो निसर्ग सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी करण्यांत येणार नियोजन व ते पण शिस्तबद्ध पद्धतीने हे महत्त्व सकारात्मक विचार करून आपण लक्षात घ्यायला हवे.
कृपया सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे ही विनंती
कळावे
वनव्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत,ग्रामस्थ पाचनई


Bhaskar Badad 10.07.2019
https://www.facebook.com/bhaskar.badad.3/posts/864074603973919

— google bad tranlation —

If you are coming to Harichandurga, please be aware that
all the trekkers, tourists, nature lovers are very pleased to inform that the Gram Panchayat, the Forest Department, the Forest Management Committee and the people of the village have come together and made a big decision.

To maintain the sanctity of Harichandragada and to avoid environmental degradation by hysteria, drinking and ammunition, tollanak has been organized by Joint Forest Management Committee, Pachanai Gram Panchayat and Forest Department, Rajur in Pachanai . The villagers have undertaken a lot of commendable activities for the development of the village and for the environment and providing employment opportunities to the youth of the village. Fudge charges, the amount of money collected through parking, is being spent on toll workers, security forces, plastic and garbage management workers and other money in village development and beautification of the village. Vaccines will be left to be checked and there is a liquor table if someone is banging alcoholic
Environmental – If caught while doing smile, Committee digestion, forest department, Rajur
And action will be taken by Rajur police station. Tickets will be issued for non-transaction of any kind of committee, each should take a receipt for the fees paid, and toll waiver only is given to local village makai Pachanachi Phetchikwadi. Special care has been taken by the Forest Department, Rajur Vati. It is also possible to purchase tourists from various types of organic food items such as handmade rice, greens, and food items and vegetables in the coming days. Under the disciplined tourism, Hirechandragaad will be able to come forward as a model tourism and arrangement as a modell by Joint Forest Management Committee, Pachanchai and Forest Department, Rajur will be a special effort to help the visiting tourists to make the challenge by dignitaries, villagers and forest department, Rajur. The decision taken by the wax digestion gramastha in the initiative is really remarkable. The reason is that the present situation of tourism is very fast and the environment is on its way to the end and if it is not saved, the local people will have to suffer this, but with this, due to global warming
Friends, dignitaries have decided that they will have to suffer, but sadly, instead of being able to do two penny pays, friends should be planning to keep the beauty of nature and it should be remembered by considering this importance positively.
Please request the cooperation of all to come together and
know
vanavyavasthapana Committee, Panchayat, the village pacanai

Visited 1 times, 1 visit(s) today

Posted

in

by

Tags: