17 rescued by Nashik Climbers and Rescuers Association one died at Dugarwadi Falls Sunday 7th August 2022

  Dugarwadi Falls Rescue Search and Recovery Operation.

https://www.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0UHLgv2Z9CZED2THo7QnZ69hQvP27wUHfE387ace7uqFk8G2oGgZpvqTUpSjchy4al&id=107729808075137

On Sunday 7th August 2022, at 10:30 PM, 

I received a call from Forest Department Trambakeshwar that 15 to 20 tourists are trapped in the Dugarwadi waterfall of Madhukar Chavan sir, but please sir, please come as soon as possible for the rescue operation with your team. 

Immediately after that the team of Nashik Climbers and Rescuers Association covered a distance of 35 km and coordinated with all the teams by gathering all the technical equipment and other necessary materials. 11 pm:‍He came towards us from above and then they took videos and pictures of him. Forest department was telling us not to move the body until we come but we requested the police personnel that if rain starts on the side of Dugarwadi and the flow of water increases, we will not be able to take him out from here and our Tarambal will fly then the constable took out the dead body stuck in the stone wall saying that we will give this idea to our superiors. As soon as the constable pulled down the t-shirt which was completely gathered around his face, Avinash’s face was clearly seen. The body was packed in the victim bag brought and brought out of the stream first. 

The villagers who came here did not come to help some of the Home Guard personnel as they were too scared. Then the water near the team ran out.Because after discussing the team members I took Somnath with me and started the route towards Ambai village to arrange water and other people. 

After about one to one and a half hour steep climb we came to the upper stage where Tanya and I had a clear contact with the walkie then from there the local guards of the local villagers home guard and some forest staff as well as Nashik climbers Dinesh Suryavanshi Sir Bhimashankar Sahane,Tanya was told to send Abhijit Wakchore and Ajay Patil down with them along with drinking water and some food items. 

Winding up the previous setup, the group had reached Ambai village. By the time the whole group reached the riverbed in half an hour, Gaurav and Om had made a rope stretcher and kept the body packed in it, because it was not possible to raise the body by putting the stretcher on it because of the steep and slippery climb, the villagers tried to raise it as best they could until they reached them. After the meeting of those who went from above with the lower group, they ate the food they had taken and drank water, recovering themselves with new vigor, at exactly 6:30 in the evening, this group reached the upper stage of Ambai village by taking a stretcher from floor to floor.After walking for another half an hour from there to the ambulance, this search and recovery operation was completed at exactly 7 pm.

One thing that needs to be mentioned in this whole operation is that the rescue operation should not be allowed to start till the arrival of trained people i.e. proper rescue team from forest department or police department. 

It is unfortunate that 17 people were pulled out but one man could not be saved because while pulling out those 17 people. There was no trained person with them, they did not know the rescue technique. 

We would humbly request all the administrative authorities that until a team is arrived which is well versed in this rescue operation, having trained members and having all the updated materials required for search and rescue, please do not dare anyone to take such a life. Don’t do it.

Nashik District Disaster Management and Maharashtra Police Training Academy Nashik have helped us a lot in this search and recovery operation.

team members

Dayanand Koli

Stay proud

Nilesh Pawar

Om Ugle

Classy Waghchaure

Ajay Patil

Bhimashankar Sahan

Dinesh Suryavanshi

Nagesh More

Devdutt Pawar

Tanya Koli

।। दुगारवाडी धबधबा रेस्क्यू सर्च अँड रिकव्हरी ऑपरेशन।।
 रविवार दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 10:30 वाजता वनविभाग त्रंबकेश्वर येथून मधुकर चव्हाण सरांचा दुगारवाडी धबधब्यात 15 ते 20 पर्यटक अडकलेले आहेत तरी सर तुम्ही तुमची टीम घेऊन रेस्क्यू ऑपरेशन साठी लवकरात लवकर या असा फोन आला. त्यानंतर लगेचच सर्व टेक्निकल इक्विपमेंट आणि इतर गरजेच्या साहित्यांची जमवाजमव करीत सर्व टीमसोबत कॉर्डिनेट करीत 35 किलोमीटरचा पल्ला पार करत नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशनची टीम रात्री 11:45 वाजता त्र्यंबकेश्वर सापगाव मार्गे दुगारवाडी धबधब्याच्या काचुरली इंट्री गेट जवळ जाऊन पोहोचली तेथे उपस्थित असलेल्या नाशिक ग्रामीण पोलीस च्या वरिष्ठ अधिकारी माधुरी कांगणे मॅडम सोबत तसेच वनाधिकारी पंकज गर्ग सर गोरे सर चव्हाण सर आणि पवार सर यांच्याशी चर्चा करून घडलेल्या प्रकारची माहिती घेऊन 11 जणांची टीम दुगारवाडी धबधब्याच्या दिशेने जंगलातील वाटेवर निघाली असता साधारण पाच मिनिटं धबधब्याच्या दिशेने चालत गेल्यानंतर अडकलेल्या 17 पर्यटकांना गावकरी वरती घेऊन आले आमची आणि त्यांची भेट झाली त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत परत माघारी कमानीपाशी आलो या 17 जणांना वाचवण्यामध्ये आमच्या टीमने काहीच मदत केली नव्हती हे सर्व ऑपरेशन स्थानिक ग्रामस्थांनी केले होते पोलिसांनी सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले अडकलेले पर्यटक आले होते त्यांना घेऊन त्रंबकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये काही पोलीस कर्मचारी निघून गेले परंतु येथे एक धक्कादायक गोष्ट गावकऱ्यांकडून सांगण्यात आली की या अडकलेल्या पर्यटकांची संख्या 18 होती त्यामध्ये 17 जणांनाच वाचवण्यात त्यांना यश आलं होतं. एक जणांना वाचवता वाचवता त्यांच्या दोरावरून हात सटकून त्यांच्या डोळ्यात देखत अविनाश गरद नावाचा व्यक्ती पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये वाहून गेला त्यावर पोलीस वरिष्ठ अधिकारी माधूरी कांगणे मॅडम फॉरेस्ट अधिकारी पंकज गर्ग आणि मी वाहून गेलेल्या अविनाश गरद याचं सर्च ऑपरेशन कशाप्रकारे राबवायचं याच्यावरती चर्चा केली मी तिथे स्पष्टपणे सांगितले की एवढ्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहामध्ये सर्च ऑपरेशन करणे शक्य नाही आपण हे सर्च ऑपरेशन सकाळी दिवस उजाडल्या उजाडल्या लगेच चालू करू पोलीस वनखाते आणि नाशिक क्लाइंबर्स या तिन्ही टीमचं एकमत होऊन नाशिक क्लाइंबर्स उद्या सकाळी लवकर सर्च ऑपरेशन चालू करेल असे ठरवून सगळेजण तिथून आपापल्या घरी परतले नाशिक क्लाइंबर्सची टीम त्यांच्या काचुरली येथील कॅपसाईट वरती थांबली तर दुसऱ्या दिवशीच्या सर्च ऑपरेशन साठी लागणाऱ्या लाईफ जॅकेट आणि मेघाफोन आणण्यासाठी स्वतः दयानंद कोळी तनया कोळी नागेश मोरे सरांसोबत नाशिकला रात्री तीन वाजता पोहोचले आणि पहाटे पाच वाजता नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यालयात जाऊन तेथून बारा लाईफ जॅकेट तसेच एक मेगाफोन घेऊन सहा वाजता त्र्यंबकेश्वर येथे पोहोचले तिथून काचुरली येथे थांबलेल्या आपल्या टीम साठी नाष्टा सोबत घेऊन साडेसहा वाजता काचुरली येथील कमानीजवळ पोहोचली इथे कॅम्पसाईटवरची टीम येऊन पोचली होती आणि आणि गरद यांच्या कंपनीतील सहकारी आले होते ज्यांनीही टीम साठी पाणी आणि नाश्ता सोबत आणला होता येथून टीमने नाश्ता करून सर्व सर्च ऑपरेशन साठी लागणारे साहित्य परिधान करून बरोबर 7:30 वाजता सर्च ऑपरेशनला सुरुवात झाली टीमने दुगारवाडी धबधब्याच्या दिशेने खाली उतरायला चालू केल अर्धा तासाच्या चालीनंतर टीम पाण्याच्या प्रवाहाजवळ पोहोचली आदल्या दिवशी गावकऱ्यांनी लावलेला काथ्याचा हार्डवेअर मध्ये मिळणारा दोरखंड तेथेच लागलेला होता त्याच्यावरून आम्हाला रात्रीच्या पाण्याचा अंदाज आला आता पाण्याच्या प्रवाहाचा थोडा वेग कमी झालेला होता सर्वप्रथम टीम लीडर दयानंद कोळी यांनी सर्व टीमला सर्च ऑपरेशन मध्ये घेण्यात येणाऱ्या सूचना सांगितल्या तीन टीम मध्ये टीम डिव्हाइड करण्यात आली एका टीमचे नेतृत्व दयानंद कोळी करणार होते जी फ्रंट मध्ये पाण्यात उतरणार होती दुसऱ्याचे नेतृत्व निलेश पवार जी बॅकअप टीम होती आणि तिसऱ्या टीमचे नेतृत्व गौरव राहणे करणार होते कंट्रोल अँड कम्युनिकेशन ची जबाबदारी तनयाकडे होती तिच्या टीम मध्ये अजय आणि अभिजीत सोबत होते आई भवानी आणि महाराजांना वंदन करून ऍक्च्युअल सर्च ऑपरेशन आता सुरू झाले गौरव आणि ओमने रोप झाडाला अँकर करून तयार झाला साधारणतः 40 ते 50 फुटाच्या अंतराचा पहिला टप्पा पार करून पलीकडे जायचं होतं त्यासाठी पाण्यामध्ये सर्वप्रथम गौरव च्या साथीने स्वतः दयानंद पाण्यामध्ये उतरले दोघेही सेपरेट रोपला अँकर झाले होते त्या दोघांचेही कंट्रोलिंग वरून ओम उगले आणि निलेश पवार करीत होते एक जण पाण्याचा प्रवाह आडवत दुसरा पुढे निघत असं एकाच्या समोर एक उभे राहून गौरव आणि दया एकमेकांना सावरत पुढे निघत होते साधारणतः विसाव्या मिनिटाला दोघेही व्यवस्थित तो प्रवाह पार करून पलीकडे गेले जेथून अविनाश गरड निसटले होते गौरव सह दयाने सर्वप्रथम टेप सिलिंगने तेथील झाडाला स्वतःला सेल्फ अँकर करून घेतले त्यानंतर कमरेचा रोप बाजूलाच असलेल्या झाडाला अँकर करून पाण्याच्या प्रवाहाचा प्रत्यक्ष अंदाज आल्याकारणाने आधी ठरलेले प्लॅनिंग मध्ये थोडा बदल करून दयानंदने ओम,निलेश सोबत देवदत्त पवार यालाही फिक्स केलेल्या रोप वरून अँकर करून प्रवाह क्रॉस करून पलीकडे बोलावून घेतले या तिघांनाही दोन्ही बाजूने अँकर होते तिघेही व्यवस्थित प्रवाह पार करून पलीकडच्या बाजूला आले येथून पुढे चिंचूताऱ्याच्या ब्रिज पर्यंत सर्च ऑपरेशन करत जायचे ठरवण्यात आले येथून चिंचूताऱ्याचे बीज पर्यंत पोहोचण्याचा अंतर साधारणतः पंधरा ते सोळा किलोमीटरचे होते एक रोप सुरक्षिततेसाठी सोबत होता ज्या वेळेला पाण्याची पातळी मांडीपर्यंत यायची त्यावेळेला लगेच सगळेजण रोप होऊन सर्च ऑपरेशन करत होते मजल दरमजल करत दोन किलोमीटर पर्यंत सर्च ऑपरेशन करत गेल्यानंतर तिथे या नदीपात्राच्या पाण्याचे रूपांतर 90 ते 100 फुटी धबधब्यामध्ये होते मग टीमने डावीकडे डोंगरामध्ये अर्धा तास वरती चढून पुढे अर्धा तास परत पुढे चालत जाऊन पुन्हा पुढच्या बाजूने पाऊण तास खाली उतरून परत त्या प्रवाहाच्या मध्ये उतरले आणि परत एकदा पाण्यातील सर्च ऑपरेशन चालू झाले दोन ठिकाणी आम्हाला अविनाश गरदने घातलेल्या शूज सारखाच एकेक शूज आढळला त्याच्या आजूबाजूच्या परिसरात परत रोप फिक्स करून आम्ही सर्चिंग केले परंतु हाती काही लागले नाही साधारणतः पावणेदोन वाजता आम्ही सात ते आठ किलोमीटरचा पल्ला पार करत अंबई गावातून खाली येणाऱ्या रस्त्यापाशी पोहोचलो येथे थोडीशी विश्रांती घेत आमच्या सोबत असलेला गावकरी सोमनाथ पारधी आम्हाला म्हणाला की सर आता आपण आपलं सर्च ऑपरेशन थांबवूया आणि वरती जाऊन उद्या परत याच ठिकाणाहून पुढे चालू करूया टीम मधील इतर सहकाऱ्यांनी त्याला दुसरा देत चालेल दादा असे म्हणायला लागले कारण येथून आम्हाला अंगावरती येणारे चढ चढत दीड तास वर चढून जायचे होते आणि तेथून गाडी रस्त्यापर्यंत पुढे अर्धा तास परंतु माझ्या अंतर्मनातून सारखं सारखं हे सांगितलं जातं होतं की काहीतरी पॉझिटिव्ह होईल हे मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर शेअर केलं आणि त्यांना सांगितलं आपण इथून पुढे साधारण अर्धा तासात निळमाती हे गाव लागते आपण त्या गावांमध्ये वरती चढू सगळ्यांचा एक मत झाल्यानंतर आम्ही निळमातीच्या दिशेने पुढे निघालो साधारणतः पन्नास मीटर पुढे गेल्यानंतर समोरच एका मोठ्या दगडाच्या खाली काहीतरी असल्याचे लांबूनच माझ्या निदर्शनास आले आणि माझ्या तोंडातून शब्द बाहेर आले थांबा मित्रांनो ते बघा समोर काहीतरी दिसत आहे सगळ्यांनी व्यवस्थित पाहिला असता खरच काहीतरी समोर असल्याचे जाणवत होते आम्ही साधारणतः 25 ते 30 फूट जवळ गेलो आणि कोणीतरी दगडाच्या कपारीमध्ये अडकून पडलेल्या अवस्थेत स्पष्टपणे दिसले इथे पाण्याचा प्रवाह अगदी कमी होता याची मान पूर्णपणे पाण्यामध्ये दोन दगडाच्या आत अडकलेली होती आणि बाकीचे शरीर दगडाच्या बाजूला वळसा मारलेला होता पाण्याच्या प्रवाहामुळे टी-शर्ट संपूर्ण मानेवरती गेलेले होते परंतु त्याची चॉकलेटी कलरची पॅन्ट होती आमच्याकडे असलेल्या अविनाश चा फोटो पाहता त्याने घातलेली पॅन्ट आणि टी-शर्ट चा कलर मॅच झाला होता मग आम्ही वॉकी टॉकी वरती तनया सोबत कम्युनिकेशन केले आणि याची माहिती फॉरेस्ट ऑफिसर गोरे सरांना कळविली त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल गावकऱ्यांसह त्याच वेळेला चिंचूतार्‍याच्या दिशेने वरती आमच्या येथे आले मग त्यांनी त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढले फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्ही आल्याशिवाय बॉडी हलवू नका असे सांगत होते परंतु आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना रिक्वेस्ट केली की जर दुगारवाडीच्या बाजूला पाऊस चालू होऊन पाण्याचा प्रवाह वाढला तर आपल्याला ह्याला येथून बाहेरी कढता येणार नाही आणि आपली ही तारांबळ उडेल मग त्या कॉन्स्टेबलने आम्ही आमच्या वरिष्ठांना याची कल्पना देऊ असे सांगत दगडाच्या कपारी मध्ये अडकलेला तो मृतदेह बाहेर काढला त्या कॉन्स्टेबलने त्याच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे गोळा झालेले टी-शर्ट खाली करताच अविनाश चा चेहरा स्पष्टपणे दिसला फोटो आणि प्रत्यक्ष असलेला इसम अविनाशच आहे असं कन्फर्म झालं मग सोबत आणलेल्या व्हिक्टीम बॅगमध्ये ती बॉडी पॅक करून त्याला सर्वप्रथम प्रवाहाच्या बाहेर आणण्यात आले येथे आलेले गावकरी होमगार्डचे काही कर्मचारी मदतीसाठी आलेच नाही कारण त्यांना खूप भीती वाटू लागली होती त्यानंतर मग टीम जवळील पाणी संपलेला असल्या कारणाने टीम मधील सदस्यांची चर्चा करून सोमनाथला सोबत घेऊन मी पाणी आणि इतर लोकांची व्यवस्था करण्यासाठी अंबई गावाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आता एक वॉकीटॉकी खालच्या टीम कडे होती एक तनया जिथे वरती होते तिथे होती परंतु या दोघांचा कम्युनिकेशन मध्ये डिस्टर्बन्स येत होता म्हणून तिसरी माझ्यासोबत घेऊन पटापट सोबत एका गावकऱ्याला घेऊन निघालो साधारण एक ते सव्वा तासाच्या खड्या चढाई नंतर आम्ही वरच्या टप्प्यावरती आलो जेथे तनयाच्या आणि माझ्या वॉकिचा स्पष्ट संपर्क झाला मग तेथून स्थानिक ग्रामस्थ होमगार्डचे स्थानिक गार्ड आणि काही वन कर्मचारी त्याचबरोबर नाशिक क्लाइंबर्सचे दिनेश सूर्यवंशी सर भीमाशंकर सहाणे, अभिजीत वाकचौरे आणि अजय पाटील हेही आपल्या सोबत पिण्याचे पाणी आणि खाण्याच्या काही वस्तू घेऊन खाली पाठवण्यासाठी तनयाला सांगण्यात आले आधीचा सेटअप वाइंडअप करून ही मंडळी अंबई गावात येऊन पोहोचलेली होती माझा निरोप वॉकीवर मिळतात ही मंडळी पटापट नदीच्या दिशेने मार्गक्रमण करत खाली आले साधारण दहाव्या मिनिटाला मला क्रॉस करून ही सारी मंडळी अर्ध्या तासात नदीपात्रात पोहोचले तोपर्यंत खाली गौरव आणि ओमने रोप स्ट्रेचर करून त्यामध्ये ती बॉडी पॅक करून ठेवलेली होती कारण स्ट्रेचर वर टाकून वर आणणं त्या अंगावर येणाऱ्या निमुळत्या आणि निसरड्या चढाई मध्ये शक्य होणार नव्हते गावकरी त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत जसं जमेल तसं वर आणण्याचा प्रयत्न खालची मंडळी करतच होते वरून गेलेल्यांची भेट खालच्या मंडळींशी झाल्यानंतर त्यांनी नेलेले खाण खाऊन पाणी पिऊन नव्या जोमाने स्वतःला सावरत संध्याकाळी ठीक साडेसहा वाजता अंबई गावाच्या वरील टप्प्यावरती स्ट्रेचर घेऊन ही मंडळी मजल दरमजल करत पोहोचली तेथून ॲम्बुलन्स पर्यंत पुढे आणखीन अर्धा तास चालत जाऊन संध्याकाळी ठीक सात वाजता हे सर्च अँड रिकव्हरी ऑपरेशन पूर्ण झालं.
ह्या संपूर्ण ऑपरेशन मध्ये एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे वनखातं असो पोलीस डिपार्टमेंट असो यांनी प्रशिक्षित लोक म्हणजेच प्रॉपर रेस्क्यू टीम येईपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन चालू करू देऊ नये दुर्दैवाची गोष्ट आहे की 17 जणांना बाहेर काढलं पण एका माणसाला वाचू शकले नाहीत कारण त्या 17 जणांना बाहेर काढताना त्यांच्यासोबत प्रशिक्षित व्यक्ती कोणी नव्हत त्यांना रेस्क्यू टेक्निक माहित नव्हत्या आमची सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना नम्र विनंती असेल की जी टीम या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये पारंगत आहे ज्यांच्याकडे प्रशिक्षित सदस्य आहेत आणि ज्यांच्याकडे सर्च आणि रेस्क्यूसाठी लागणारे सर्व अद्यावत साहित्य आहेत अशी टीम येईपर्यंत कृपया कोणालाही अशा प्रकारचे जीव घेणे धाडस करून देऊ नका.
नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची तसेच महाराष्ट्र पोलीस ट्रेनिंग अकादमी नाशिक यांची या सर्च अँड रिकवरी ऑपरेशन मध्ये खूप मोलाची मदत आम्हाला झाली त्याबद्दल आम्ही आमच्या नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर साहेब नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या सर्व अधिकारी वर्ग तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक यांचे आभारी आहोत.
टीम मेंबर्स
दयानंद कोळी
गौरव रहाणे
निलेश पवार
ओम उगले
अभिजात वाघचौरे
अजय पाटील
भिमाशंकर सहाने
दिनेश सुर्यवंशी
नागेश मोरे
देवदत्त पवार
तनया कोळी

Posted

in

by

Tags: