—
सांदण दरीत, रतनगडावर ट्रेकिंग; काजव्यांचे निरीक्षण
—
सोलापूर : इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून जवळपास 128 पर्यावरणप्रेमींनी 7 आणि 8 जून 2019 रोजी भंडारदरा परिसरात निसर्ग भ्रमंती केली. आशिया खंडातील दोन नंबरच्या सांदण दरीत आणि 4300 फूट उंच रतनगडावर उत्साहाने ट्रेकिंग केले. अंधार होताच हिरडा, बेहडा, सादडा आदी वृक्षांवर लुकलुकणाऱ्या असंख्य काजव्यांनी पर्यावरणप्रेमींना थक्क केले. हिरडा, बेहडा, सादडा आदी झाडांवर जणू जत्राच भरलीय अशा पद्धतीने काजवे चमकत होते.
सोलापूरसह बार्शी, पंढरपूर, पुणे, औरंगाबाद, बीड , जालना, बुलढाणा, सातारा, सांगली येथील निसर्गप्रेमी या उपक्रमात सहभागी झाले होते. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष होते. निसर्ग भ्रमंतीदरम्यान सीड बॉल टाकण्यात आले. आदिवासी बांधवांशी संवाद साधताना निसर्ग संवधर्नाचा जागर करण्यात आला. निसर्ग भ्रमंतीमध्ये अनेकांनी फोटोग्राफीचाही आनंद लुटला.
सर्वात लहान ट्रेकर सायली थिटे हिने 4300 फूट उंच 14 किलोमीटरचा ट्रेक कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या आई-बाबांसोबत पूर्ण केला. सायलीसोबतच छोटे ट्रेकर प्रतिक्षा, सक्षम, तेजल यांनीही सर्वांचा उत्साह वाढविला.
साम्रद गावातील आदिवासी कुटूंबातील नवदांपत्य राहुल आणि विजया यांना इको फ्रेंडली क्लबच्यावतीने भेटवस्तू देण्यात आली. बांडे कुटुंबियांनी मुक्कामाची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती.
स्थानिक तरुण अतुल बांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे, कार्याध्यक्ष भाऊराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ सदस्य तथा शैक्षणिक विभाग समन्वयक संजीवकुमार कलशेट्टी, औरंगाबाद विभाग समन्वयक जगन्नाथ राऊत, सांगली-सातारा विभाग समन्वयक प्रविण जाधव, पुणे विभाग समन्वयक महेंद्र राजे, पंढरपूर विभाग समन्वयक रसिका संत, सदस्य शिवराम सरवदे, अंबरीश कदम, अभिषेक दुलंगे, सिध्दाराम बिराजदार, प्रा. सारंग तारे, समर्थ देशपांडे, स्वाती भोसले, सरस्वती कोकणे, दुर्गा थिटे, श्रद्धा सक्करगी, डॉ. वंदना यादव, डॉ. छाया महाजन, उमाकांत धनशेट्टी, सर्वेश देवस्थळी, संतोष थिटे, राजेश पाटील, वेदांत गनमोटे यांच्या सोबतीने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
#EcoFriendlyClub #भंडारदरा #सांदणदरी #रतनगड #निसर्गभ्रमंती #निसर्ग #पर्यटन
अधिक छायाचित्रे..⤵