नियंत्रण करण्याचे अध्यादेश जारी

नियंत्रण करण्याचे अध्यादेश जारी
तुर्तास बंदी नाही…पण जरा सबुरीने!

गडकिल्ल्यांवर उसळणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला
उपायोजना राबविण्याचे अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी वैनतेय गिर्यारोहण संस्थेच्या काही पदाधिकार्‍यांना या संबंधी माहिती दिली. मागच्या रविवारी हरिहर किल्ल्यावर अभूतपूर्व गर्दी उसळली होती. आज हरिहरवर फार मोठी गर्दी झाली नाही. गर्दीचे केंद्र लोणावळ्या जवळच्या लोहगड विसापूरकडे वळल्याचे चित्र बघायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार पुणे-लोणावळा लोकलमधून तब्बल दोन हजार पावसाळी पर्यटकांचा समुदाय माळवली स्थानकावर उतरताना बघितल्याचे वृत्त काही ट्रेकर्सनी दिले.

वैनतेय गिरीभ्रमण संस्था व हिमालयन क्लब यांच्या वतिने कालिदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या बांफ माऊन्टन फिल्म फेस्टिव्हलच्या उद्‌घाटन समारंभा प्रसंगी वैनतेयच्या पदाधिकार्‍यांशी बोलताना जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी या संबंधी माहिती दिली. या कार्यक्रमाला नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, टीजेएसबी बॅंकेचे संचालक रमेश कनानी, एव्हररेस्टवीर महाजन बंधू, आयर्नमॅन ट्रायथलॉनचा स्पर्धक अम्मार मियाजी, वैनतेयचे गिरीष टकले, राहुल सोनवणे  आदी मान्यवर उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर जवळच्या हरिहर किल्ल्यावर मागच्या रविवारी २३ जुन रोजी अचानकपणे दोन हजर पर्यटकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे हरिहरवर ऐतिहासिक बोटलनेक तयार झाला होता. या अभूतपूर्व ट्रॅफिक जॅममध्ये पर्यटकांच्या झुंडी चार तासांपासून ते सात तासांपर्यंत अडकून पडल्या होत्या. शेवटी काही अनूभवी व जबाबदार ट्रेकर्सनी पुढाकार घेऊन मोठ्या कष्टाने हरिहरच्या अत्यंत अवघड व धोकादायक मार्गावरची कोंडी सोडविली.
गिर्यारोहण विश्वात या घटनेची राज्यभरात मोठी चर्चा झाली. सुदैवाने कोणताही मोठा अपघात या ठिकाणी घडला नाही. हरिहरवर आता पर्यटकांना जाण्याची बंदी येते की काय? अशी भिती व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष असलेल्या श्री मांढरे यांनी नाशिकच्या प्रसिद्ध गिरीस्थळांवर गर्दी उसळून मोठी आपत्ती उदभवणार नाही या करिता आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम २५ पोट कलम (अ) अन्वये नाशिकच्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला विविध उपाययोजना राबविण्याचे आदेश जारी केले आहेत.
पर्यटक, गिर्यारोहक व भाविकांची गर्दी अशा प्रसिद्ध ठिकाणी उसळल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवणे व संरक्षणाच्या विविध उपाय योजना राबविण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच काही ठिकाणी कठडे उभारावेत असेही अध्यादेशात म्हटले आहे.

आज पहाटे पासूनच  जोरदार पाऊस सुरू होता. सगळ्यांची अटकळ होती की, पुन्हा हरिहवर गर्दी उसळेल, परंतू ही गर्दी राज्याच्या विविध ठिकाणी समसमान विभागली गेल्याचे चित्र बघायला मिळाले. कोरीगडावर सातशेच्या आसपास समूदाय दिसून आला तर, नाणेघाटात दोनशेच्या आसपास पर्यटक दिसून आले. अंधारबन, देवकुंड धबधबा या ठिकाणी मोठ्या संख्योने पावसाळी पर्यटक दाख झाले. गोरखकड, कोथळीगड, नाखिंदा, राजमाची, तिकोना, प्रबळमाची, घनगड, कलावंतिणीचा महाल, गारबेट, ईरशाळगड, तिकोना आदी ठिकाणी लहान मोठे समूह आज भटकंतीकरिता गेले होते. रतनगडावर एकच ८० जणांचा समूह होता. याशिवाय आणखी काही समूह जाण्याच्या बेतात होते, परंतू त्यासंबंधी माहिती अध्याप प्राप्त झालेली नाही.
हरिश्चंद्रगड, कळसुबाई, पेब या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी उसळल्याची माहिती मिळाली, परंतू भटक्यांचा नेमका आकडा समोर आलेला नाही.

— via google translate—

Crowds on the fortresses 
Regulation Ordinance Issue
Not a ban … But just a little bit submissive!
All the administrative machinery in Nashik district to control crowds on the fort 
Ordinance to implement the measures has been issued. District Collector, Suraj Mandhare, President and Collector of District Disaster Management Authority, informed about some officials of the Vanitya Mountaineering Society. On the previous Sunday, there was an unprecedented rush at Harihar Fort. Today there is not a huge crowd at Harihhar. The picture of the crowd turned towards Lohgad Visapur near Lonavlya. According to the information, some trekkers have reported from the Pune-Lonavla local area that about two thousand monsoon tourists have landed in Malwale station.
Speaking to the office bearers of Vanateyaya on the occasion of the inauguration of the Barfi Mountain Film Festival held at Kalidas Kalamandir by Vanateey Giribhraman Sansthan and Himalayan Club, District Collector Mr. Mandhare informed about this. Nashik Police Commissioner Vishwas Nangre Patil, TJSB Bank Director Ramesh Kanani, Everestee Mahajan Brothers, Ironman Triathlon Competitor Ammar Miyaji, Vanateey Girish Tuckley, Rahul Sonawane and others were present on the occasion. 
On 23 rd of Sunday, there was a crowd of tourists visiting suddenly, on the Harihar fort near Trimbakeshwar. Therefore, Harihar was created by the historical Bottlene. In this unprecedented traffic jam, the crowd of tourists were stuck for four hours to seven hours. In the end, with some tremendous and responsible Trekkers taking the initiative, it is difficult to solve the very difficult and dangerous path of Harihar.
There has been a big debate throughout the state of the mountaineering world. Fortunately no major accident happened at this place. What is the ban on tourists going to Harihar now? Such fear was expressed. On this backdrop, Mr. Mandhare, who is the President of District Disaster Management Authority, has issued orders to implement various measures to all the administrative machinery of Nashik under Section 25 (a) of Disaster Management Act, 2005, for not being able to create a big disaster in the famous Giri Sthan of Nashik.
Tourists, mountaineers and crowd of devotees have been ordered to keep control over the crowd and implement various measures for protection. The ordinance also said that some of the places should be set up. 
It was quite rain since morning only. Everyone was convinced that there would be a rush on Harihal again, but the crowd got divided into different parts of the state. If there is a community of around 700 people in Korigada, around two hundred tourists are found in Naneghat. Rainforest tourists were organized in large numbers in the area of ​​Darkbank, Devakund waterfalls. Small groups in Gorakhkad, Kothligad, Nakhinda, Rajmachi, Tikona, Prabalmachi, Ghangad, Kalavantini Mahal, Garbat, Irshalgad, Tikona etc. were on the go for the wanderings. Ratangad had only a group of 80 people. Apart from this, a few more groups were about to go but no information was received about it. 
Harishchandragad, Kisubai, Peb, got information about a large number of crowds, but the exact number of strollers was not noticed.

Posted

in

by

Tags: