झालेल्या घटनेस एक वर्ष पूर्ण आणि दोन्ही वेक्ती सुखरूप आहेत.
#राजाशिवछत्रपतीपरिवार
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1444603255685302&id=100004069230054
🚩 *——— पान क्रमांक ०१ ——–* 🚩
🚩🚩🚩 *जय शिवराय*🚩🚩🚩
*एक अविस्मरणीय मोहीम*
०९/०७/२०१७ रोजी झालेली मोहीम ही माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय मोहीम राहील. या मोहीमेत अनेक काही गोष्टी घडून गेल्या त्या अविसमरर्णीय राहतील. सर आजच्या *राजा शिवछत्रपती परिवार* आयोजित *वृक्षारोपण मोहिमेच्या* अवचित्तेत खऱ्या अर्थाने आपल्या *राजा शिवछत्रपती परिवाराचे रोप* त्या घटनेत असलेल्या माणसाच्या मनात ठासून ठासून भरले. खऱ्या अर्थाने आज घडली *परिवाराची वृक्षारोपण मोहीम*
मोहिमेला २ दिवस राहिले तरी रायगड विभागाची काहीच तयारी नव्हती. मोहीम घेण्याची किव्हा नाही हाच मोठा प्रश्न पडला होता कारण १५ दिवस अगोदर भिवगडावर रायगड विभागाची वृक्षारोपण मोहीम झाली होती. आणि ही मोहीम पण होती. पण सर्व विभागाची एकच दिवस मोहीम होणार होती म्हणून कोणत्याही परिस्तिथीत घेणे गरजेचे होते. पण जास्त मावळ्याच्यावर दबाव न टाकता जेवढे मावळे येतील त्यांना घेऊन मोहीम कराची होती कारण पुढील महिन्यात पण परिवाराची मुख्य मोहीम होणार होती. आमच्या परिसरात सर्व ठिकाणी शेतीचे काम चालू असल्यामुळे जास्त मावळे तयार होणार नव्हते हे आधीच माहिती होते. पण मनात विचार केला की १० मावळे असतील तरी चालतील पण मोहीम काराचीच.
मोहिमेच्या २ दिवस अगोदर मोहिमेला येणाऱ्या मावळ्यांची यादी बनवण्यासाठी घेतली. यादीतील नावे ७ वर अडकली होती. कोणाची नावे येत नव्हती. पण कोणाला काहीच बोलता येणार नव्हते कारण सर्व मावळ्यांची शेतीची कामे होती. या मोहिमेची जबाबदारी महेश दादा शिंगटे, सचिन दादा भगित, जगदीश दादा आगीवले व पोशिराच्या अन्य मावळ्यावर देण्याची होती. कारण मला, किरण दादा आणि कल्पेश दादा यांना मुख्य मोहिमेची तयारी कराची होती. पण महेश दादा सचिन दादा आणि पोशिराच्या इतर मावळ्यांना शेतीची कामे असल्या मुळे त्यांनी सांगितले की आम्हाला मोहिमेचे नियोजन करता येणार नाही. त्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या कारण भात लागवडीचा हाच हंगाम असतो. नियोजन जास्त काही केलं नाही. नेरळ स्टेशन पासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या *पेब (विकटगड)* हा किल्ला निवडला कारण हा किल्ला अगदी जवळ होता. विचार असाच केलात की लवकर जाऊन १२ वाजे परियात घरी येण्याचं. दुसऱ्या दिवशी म्हणजे मोहिमेच्या आदल्या दिवशी कशीतरी १८ नावे अली होती. पण काही जणांनी मुदाऊन नावे दिली होती कारण ती नावे बघून तरी काही जण येतील. पण नावे १८ होती पुढे काही जाताच नव्हती. निखिल दादा चोनकार यांनी ५० झाडे दिली. त्या दिवशी लाईट नसल्यामुळे माझा फोन बंद होता सर्व जण फोन लावत होते पण फोन काही लागला नाही. पण जॉब वरून आल्यावर बस मधून उतरलो तेवढ्यात निखिल दादा दिसले ते झाडे आणण्यासाठी चालले होते. त्यांना पुढे जयाला सांगून मी घरी जाऊन बॅग ठेवली आणि मित्राची गाडी घेऊन झाडे आणण्यासाठी गेलो. ५० झाडे घेऊन निखिल दादा आणि मी ती झाडे विजय दादाच्या घरी ठेवली. किरण दादा घरी येऊन मोहिमे विषयी थोडी चर्चा केली. नंतर विजय दादा जॉब वरून आले होते त्यांनी फोन केला व आम्ही त्यांना भेटून मोहिमेची आणि मुख्य मोहीमेचे चर्चा केली. वयक्तिक प्रॉब्लेम मुले विजय दादा येणार नव्हते. मोहिमेच्या आधल्या दिवशी दुसऱ्या गावामध्ये आमच्या वयक्तिक ग्रुपची (ओम साई ग्रुप) ची मिटिंग होती ती मिटिंग रात्री १२ वाजे परियात चालली पण दुसऱ्या दिवशी मोहिमेला जायचं होतं म्हणून मित्राला रात्रीच घरी पोचवला सांगितलं.
प्रत्येक वेळी अस का होत माहिती नाही. पण मोहिमेच्या वेळी आटोमॅटिक लवकर जग येते. उजेडाचा तो सुवर्ण रत्न दिवस जग तशी ५ वाजताच अली होती पण टाइम अजून होता. ५:३० ला जयेश दादाचा फोन आला होता की उठले की नाही या साठी पण अजून टाइम होता. ६ वाजता उठलो. विशाल दादा खुणे यांचा फोन आला की दादा तुम्ही घरी आले आहात ना तर त्यांना हो बोलून घरी येण्याला सांगितले ६:३० पर्यत तयार होऊन. आम्ही निघालो. पण नेहमी प्रमाणे या वेळेस सुद्धा जयेश दादा लेट झाले होते. किरण दादा आले नंतर झाडे उभी करण्यासाठी काठी तयार करत असल्यामुळे जयेश दादांना उशीर झाला. तसे ते घरातून पण उशिरा निघाले होते. किरण दादा, निखिल दादा, विशाल दादा, जयेश दादा आणि मी विजय दादाच्या घरून ५० ऐवजी ३० झाडे घेऊन मोहिमेला निघालो कारण मावळ्यांची संख्या कमी होती म्हणून कमी झाडे घेतली होती. विजय दादांनी मोहिमेच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या. मोहीमेसाठी रवाना झालो. जगदीश दादा आणि सचिन दादा कधी पासून आमची वाट पाहत होते. रस्त्यात जाता जाता कल्पेश दादा ना फोन लावला तेवढ्या वेळेत ते उठले होते. पण आम्ही पोचलो तेव्हा ते निघाले होते. संतोष दादा शेळके याच्या घरी केतन दादा, धीरज दादा, सचिन दादा आमची कधी पासून वाट पाहत होते. केतन दादा आणि धीरज दादा तर ६:३० ला आले होते. काही करणा मुळे काही गाड्या कमी झाल्या होत्या. किरण दादांनी अजून एक गाडी मॅनेज करून दिली. राकेश दादा साहित्य घेऊन तयार होते त्यांना गाडीवर घेऊन मावळे *पेब (विकटगड – माथेरान नेरळ)* किल्यावर रवाना झाले. संतोष दादा शेळके, केतन दादा, धीरज दादा, राकेश दादा, जयेश दादा, सचिन दादा, विशाल दादा, जगदिश दादा, किरण दादा, कल्पेश दादा, निखिल दादा आणि मी असे एकूण १२ मावळे निघाले. ९ वाजेपर्यंत गडावर पोचलो. चालता चालता *जय जिजाऊ, जय शिवराय* *हर हर महादेव* आशा अनेक घोषात गड घुमघुमवला होता. दुर्ग पूजन संतोष दादा शेळके यांच्या हस्ते झाले. काही आलेल्या ट्रेकर्स नि सुद्धा दुर्ग पूजनात सहभाग घेतला. संतोष दादांनी एका गजल रुपात महाराजांची स्तुती करून मोहिमेचे व आजच्या दिवसाचे महत्व सांगितले. जयेश दादांनी गारद दिली. आलेल्या ट्रेकर्सच्या एका कडून नारळ फोडून मोहिमेची सुरवात केली. सगळ्यांना आपापली कामे सांगून दिली. सर्वनी ३०झाडे लावली. सचिन दादा प्रत्येक मावळ्यांचे फोटो घेत होते. कल्पेश दादा आणि मी झाडे कुठे लावाची हे ठरून पुढील मावळ्यांना काम कराला सांगत होतो. विशाल दादा आणि केतन दादा तेव्हढी जागा साफ करून ठेवत होते. संतोष दादा योग्य प्रकारे मार्गदर्शन करत होते. वृक्षारोपण नंतर पुढे एक समाधी होती तिला सतीची समाधी म्हणून काही जण बोलतात तिला साफ केली. ती समाधी साफ करता करता काही जण सिगरेट पेत होते. कल्पेश दादा आणि मी जाऊन त्यांना योग्य प्रकारे समजावले. त्यांनी आपली चुकी मान्य केली. चौथरा बांधला आणि काम झाले. संतोष दादांना कामावर व सचिन दादांना शेतावर जायचे असल्यामुळे ते जाण्यास निघाले. नंतर सगळ्यांनी आपले मनोगत वेक्त केले. सर्व मावळ्यांना किल्ला बघायचा होता म्हणून बाकी १० मावळे किल्ला बघण्यासाठी निघाले. तिथे असलेल्या मठामध्ये बाकीचे साहित्य ठेऊन गड फिरण्यास गेलो. पाऊस चालूच होता गड फिरत फिरता गडावरील कचरा साफ केला. गुफेत जाऊन तिथली घाण काढली महाराजांचा पुतळा आणि शिवलिंग धुतली पूजा करून सर्वांनी आरती घेतली आणि तिकडचा कचरा घेऊन परत मठाकडे निघालो त्या गुफे मध्ये व त्याच्या बाहेर भरपूर प्रमाणात ट्रेकर्स होते. कल्पेश दादा आणि जयेश दादा यांनी सगळ्यांना बजावून आले की कोणीही घाण करू नका. मठाकडे जातात जाता पेब किल्ल्यावर ७ पाण्याच्या टाक्या आहेत हे समजले होते एवढ्या वेला जाऊन त्या कधी दिसल्या नव्हत्या म्हणून त्या बघण्यासाठी गेलो पण त्या काही दिसल्या नाही फक्त एक दुसरी गुफा दिसली नंतर सगळे मठाकडे निघाले पण मी हट्ट धरला की पाहिले शिव मंदिराकडे जाऊ नंतर मठात जाऊ पण कल्पेश दादा माझ्या वर ओरडले व आम्ही मठात गेलो. मठाकडे जातात जाता पेब किल्ल्यावर ७ पाण्याच्या टाक्या आहेत हे समजले होते एवढ्या वेला जाऊन त्या कधी दिसल्या नव्हत्या म्हणून त्या बघण्यासाठी गेलो पण त्या काही दिसल्या नाही फक्त एक दुसरी गुफा दिसली नंतर सगळे मठाकडे निघाले पण मी हट्ट धरला की पाहिले शिव मंदिराकडे जाऊ नंतर मठात जाऊ पण कल्पेश दादा माझ्या वर ओरडले व आम्ही मठात गेलो.
🚩⚔ *एक मावळा* ⚔🚩
*राजा शिवछत्रपती परिवाराचा*
🚩 *——— पान क्रमांक ०२ ——–* 🚩
मठात गेलो तेव्हा मठातील माई म्हणाल्या की तुम्ही खाली जाताना हा दोर घेऊन जाणार का तेवढ्यात मी आणि कल्पेश नि कारण विचारले तेव्हा त्या माई म्हणाल्या की घलई मध्ये एक मुलगा एक मुलगी पडली आहे त्यांना काढण्या साठी मनात वेगळेच आले व क्षणाचा विचार करता मी आणि कल्पेश धावत निघालो. बाकीच्या मावळ्यांना साहित्य घेऊन येण्याला सांगितले. एक सिडीच्या येथे खूप गारदी होती उतरताना खूप जण घाबरतात पण आम्ही कधी आणि कसे उतरले तेच आठवत नाही आणि वाराच्या वेगात घटनास्थळी पोचत होतो. मी माझ्या मागे कल्पेश खूप जोरात धावत होतो. सगळे ट्रेकर्स आम्हाला जागा देत होते. घटनास्थळी पोचलो तेव्हा काही माणसे दोर पकडून होती खालती बघितले तर मठातील महाराज खाली उतरले होते. मनात एक क्षणाचा विचार आला एक दृश्य आठवला *वीर तानाजी मालुसरे* आणि *किल्ले कोंढाणा* मग काय अंगात काटा मारला.
*अंगात होता भगवा, त्यावर होती माझ्या राज्याची प्रतिमा !!*
*मनात होती वीर तानाजी मालुसरे यांची कथा !!*
*घेतली उडी त्या घलईत, विचार केला असू मावळे केव्हा तरी !!*
या विचारांनी घलईत उतरलो. कसा उतरलो माहितीच नाही. महाराजांच्या कडेला गेलो. त्यांनी त्या मुलाला वरती घेऊन जयाला सांगितले आणि ते बोलले की मो खालती जातो त्या मुली कडे साधारण मुलगा २५० फूट खाली होता आणि मुलगी ३०० ते ३५० फूट खाली तेवढ्यात त्या मुलाच्या कडेला गेलो तर तो ठीक होता पण त्याच्या पायाला खूप मार होता हात मोडला होता पाय पण मोडला होता. गबलेत पण हात घालू नाही शकत तेव्हढ्यात कल्पेश दादांना खाली बोलावले ते आले तो मुलगा बोलत होता त्यांनी सांगितले की खाली माझी बॅग गेली आहे त्यात एक मोठी रोप (दोरी) आहे. कल्पेश दादांना तिथेच थांबून मी खालती उतरत होती बाकी मावळे पण पोचले होते त्यांनी दोर पकडून ठेवला होता. उतरण्याच्या अगोदर तिथे असलेल्या काही जणांना विचारलं होत की पोलिसांना फोन केला का तर ते बोलले हो केला होता. खाली पोचलो त्याची बॅग खाली पडली होती. ती घेतली त्यात रोप आणि ट्रॅकिंग चे बरेच साहित्य होते. ते घेऊन परत त्या मुलाकडे गेलो. तिथे कल्पेश दादा होते. त्या मुलांनी दोर कसे बाधाचा ते सांगितले कारण तो एक ट्रेकर्स होता. महाराजांना असती असती दोरी पण सोडाची होती. काही वेळात महाराज त्या मुलीपाशी पोचले. कल्पेश दादांनी मला त्या मुलीच्या मदतीला जायला सांगितले. मी किरण दादांना खाली बोलावले आणि मी त्या मुलीकडे गेलो जाता जाता खूप काटे भरत होते पण तिकडे काहीच लक्ष नव्हते. महाराजांनी रस्ता कराला सांगितलं तेवढ्यात किरण दादांना खाली बोलावले आणि अजून खाली जाऊन त्याची अजून एक बॅग पडली होती ती घेतली. त्यात औषधी सगळ्या गोष्टी होत्या त्या मुलीला खूप खरचटले होते आणि डोक्यामध्ये खूप लागले होते त्यात डेटॉल घेऊन टाकले. ती थोडी बेशुद्ध अवस्थेत होती किरण दादा रस्ता करत होते कल्पेश दादा दुसरा दोर टाकून त्या मुलाला वरती घेत होते त्याच्या जोडीला एक वन विभाग अधिकारी उतरला होता आजून २ जण होती कोण होती माहिती नाही पण माथेराची मुले होती. त्या मुलीला थोडे चालता येत होते. पण ती खूप घाबरली होती तिला नीट बसता पण नव्हते येत. महाराजांना सांगितले तुम्ही पायाच्या साईट नि पकडा मी गबलेत पकडतो थोडी थोडी तिला वरती घेऊ पाऊस चालू होता आणि जिथे पडली होती तिथे नाला होता म्हणजे पाणी चालू होता. पाय थोडे घसरत होते महाराजांना जेवढी दोरी पाहिजे तेवढी सोडला किव्हा वरती खेचला लागत होती ते ओरडला लागत होते. नंतर मी महाराजांना सांगितले आपल्याला एक डोली तयार करावी लागेल तशी ही मुलगी वर जाणार नाही कारण ती मुलगी जाडी होती खूप जड पण होती. आणि अंतर पण खूप होते. किरण दादांना डोली बनवला सांगितली पण त्या काही समजले नाही की डोली कशी बनवाची ते मग त्यांना खाली बोलून मी वरती गेलो आणि निखिल दादा पण खाली उतरले. त्या मुलाला वर पोचवण्यात कल्पेश दादांना यश आले होते मी विशाल दादांना आणि राकेश दादांना लवकर दोन मोठ्या काठ्या तोंडाला सांगितल्या ते गेले. इकडे जगदीश दादा फोटो काढणार्यांना ओरडत होते बाकी सगळे दोर पकडून होते परत वरून कोणीतरी साडी आणली ती खालती घेऊन गेलो त्या मुलीला थंडी वाजत होती म्हणून कल्पेश दादा आपला रेनकोट घेऊन खाली गेले. अजून काही जण गेले. विशाल दादांना आणि राकेश दादांना पाहिजे तशी काठी नव्हती भेटली पण विशाल दादा वरती जाऊन आले होते त्यांनी काठी कुठे आहे ते सांगितले. आम्ही दोघे वरती गेलो रस्त्यात खूप माणसे होती पण आम्हाला लगेच जाण्यासाठी जागा देत होते शिडीच्या इथे ५०० ते ८०० अजून ट्रेकर्स होते सगळे असती असती उतरत होते काही मुले त्यांना मदत करत होते. शिव मंदिराच्या इथे मंदिर बाधाचा काम चालू होते ते बनवण्या साठी एक पराची बांधली होती ती तोडली विशाल दादांनी आणि आम्ही ते घेऊन परत त्याच वेगाने घटनास्थळी जाण्यास निघालो. सिडीमध्ये त्या काठ्या पार्सल करत पुढे पाठवल्या येत येत काही जण बोलत होते की अरे ही मुले तर गडावर झाडे लावत होती काही बोलत की हे तर समाधी साफ करत होती काही बोलत होती की हे तर गुफा साफ करत होती याना काय अचानक झालं आहे. काही जणांना माहिती होते की काय झालं आहे म्हणून ते पटकन जागा देत होते. खालती पोचलो कधी डोली बनवली नव्हती पण कशीतरी बनवण्याचा पर्यत करत होतो पोचलो तेव्हा त्या मुलीला पण काढण्यात यश आले होते.
विशाल दादा राकेश दादा अजून एक कोणतरी माणूस आणि मी कशी तरी डोली बनवली आणि पाहिले त्यांत मी बसून पाहिले ती वेवस्तीत होती. जगदीश दादा ट्रेकर्स लोकांना घेत होते. मुलीला काढल्या नंतर रिस्किव वाले आले होते. आणि यशवती ग्रुप मुलीला थोड्या टप्पा राहिला तेव्हा आले होता. माझी आणि एक पोलीस वल्याची थोडी बाचाबाची झाली कारण ते बोलत मागे राहिलेले ५०० ते ६०० ट्रेकर्स आहेत त्यांना जाऊद्या मग माझी हटली मी उलटाच बोललो. मागचे ट्रेकर्स पण बोलत होते की आम्ही भले थांबतो पण जे जखमी आहेत त्यांना न्या दुसरी एक डोली पटकन बनवली त्यात मागचे ट्रेकर्स खाली बसून राहिले होते. पत्रकार लोकांचे फोटोग्राफी चालू होती कोणाचे काय आणि कोणाचे काय काही तर त्यातले सेल्फी काढत होते. मुलीला त्या यशवंती ग्रुप ने खांद्यावर घेतले. आणि त्या मुलाला डोळीत घेतले. ती डोली पकडला मागे मी राहिलो आणि पुढे एक माणूस राहिला रस्ता तसा एक वेळी एक माणसाचा होता चालला खूप अवघड जात होता पण कसेतरी पुढे जात होतो. यशवती ग्रुप बोलत होता की डोली बरोबर नाही बनवली ज्या डोली मध्ये त्या मुलाला खालून वर पर्यत नेले ती डोली बरोबर नव्हती मग अजून डोकं फिरले. आणि नेता नेता मॅनेजमेंट मध्ये अर्धा वेळ जात होता मग तर खूप बडबड केली त्यांना त्याला पहिल्यांदा वरती न्या मग काय ते बघू त्यातील रिस्किव हेड होता तो मी बोलल्या प्रमाणे चालत होता पुर्ण दिवस काम आणि नंतरची या ट्रेकर्स ला काढण्याची धावपळ झाली त्यात थकून गेलो होतो म्हणून डोली दुसऱ्या माणसाकडे दिली आणि तरीसुद्धा मी त्याचा मागेच होतो माझ्या बरोबर केतन दादा होते त्यांना *जय जिजाऊ, जय शिवराय हर हर महादेव* या घोषात वर परियात पोचवले. सगळे माणसे आपल्या मुलांना धन्यवाद देत होते रिस्किव हेड ने पण आपले अभिनंदन केले त्यांनी माझा नंबर पण घेतला त्या मुलीच्या बरोबर होते त्या पण अभिनंदन करत होत्या. उशीर खूप झाला होता म्हणून तिथे जास्त थांबलो नाही व सगळ्या मावळ्यांना घेऊन पुढे निघालो.
घटना इथेच संपली नाही पुढे ही काही झाले.
वरच्या घटनेला पत्रकाराने आणि न्यूज वल्याने वेगळ्याच प्रकारात रंगवले. स्वतःच्या नावासाठी व मोठ्यापणासाठी काहीही लिहले. राग परिवाराचा नाव नाही आले म्हणून नाही तर राग हे पत्रकार दुसऱ्या काही घटना पण खाऱ्याच लिहत असतील हे कशावरून.
पुढील घटना पुढे
🚩⚔ *एक मावळा* ⚔🚩
*राजा शिवछत्रपती परिवाराचा*
🚩 *——— पान क्रमांक ०३ ——–* 🚩
केतन दादा किरण दादा विशाल दादा आणि मी झालेल्या घटनेवर चर्चा करत पुढे चाललो होतो. १५ ते २० मिनिटात आम्ही ज्या ठिकाणी गाड्या ठेवल्या होत्या तिथे पोचलो. कल्पेश दादा आणि बाकीचे मावळे आले नव्हते आम्ही तो परियात गाडी काढून थांबलो होतो. १० मिनिटं नंतर कल्पेश दादा, जयेश दादा आणि बाकीचे मावळे आले होते. त्याच्या पाठी ६ मुली व १ मुलगा होता. कल्पेश दादांना काय झालं आहे हे विचारलं. त्यांनी सांगितले की याच्या पाठी त्याचे भाऊ होते पण बाकीच्या माणसांना पास करण्यासाठी ते मागे थांबले होते. व या मुलींना पुढे पाठवले होते रस्ता सुमसाम होता सगळे लोक दुसऱ्या रस्त्याने गेले होते आम्ही आलो तो रस्ता शॉटकट होता. त्या मुली आमच्या गाडीच्या इथे थांबल्या त्यांना सोडून तर पुढे आम्ही पण जाऊ शकत नव्हतो. आणि त्या मुली स्वतः बोलल्या की आमचे भाऊ येस पर्यत थांबा मग तर थांबणे गरजेचे होते. आणि त्या मुली नसत्या बोलल्या तरी आपले मावळे थांबले होते. कल्पेश दादांनी बिस्कीट आणले होते सगळ्यांनी वाटून खाल्ले त्यांना पण दिले अंधार खूप होता पण मोबाईलची लाईट लावली होती. त्यांना थोडे हसण्याचा प्रयत्न करत होतो त्यांना वाटून दिले नाही की आम्ही कोण वेगळेच आहोत. त्यात *एक मुलगी बोलली की हे तर मावळे आहेत.* तेवढ्यात अंगात पटकन काटा मारला.
कोणता हा विश्वास माझ्या राजा वरचा का एवढा विश्वस त्याच्यावर कारण संपूर्ण जगाला माहिती आहे माझ्या राज्यांनी कोणत्याही स्त्री चा अनादर केला नव्हता म्हणून आता फक्त महाराजांचा फोटो किव्हा अंगात भगवा तरी दिसला तरी कोणालाही वाटेल की आपण सुरक्षित आहोत. ह्या प्रसंगाची आठवण तरी केली ना तर डोळ्यातून पाणीच येतो. आता लिहता वेळेस पण डोळ्यात पाणी येतो. *कसा होता माझा राजा काय होती त्याची किमया* नंतर बऱ्याच उशिरात त्याचा फोन लागला त्या मुलींनी त्याच्या भाऊंना विचारलं तुम्ही कुठे आहेत आम्ही पुढे जातो तुम्ही त्या ठिकाणी या पण त्याचा आवाज येत नव्हता नंतर कसातरी आवाज आला आणि ते बोलले की आम्ही तर पुढे टॅक्ससीत बसलो आहे तुम्ही आम्हाला नेरळ ला भेटा त्या मुली थोड्या घाबरल्या पण मावळ्यांनी सांगितले आम्ही तुमच्या बरोबर येतो तुम्हाला गाडीत बसून देतो पुढे जयेश दादाची आणि किरण दादांची गाडी मागे माझी गाडी आणि कल्पेश दादांची गाडी आणि बाकीचे मावळे त्याच्या बरोबर मोबाईलची लाईट दाखवत. त्यांना टॅक्ससी स्टँड पर्यत पोचवत होतो. तेव्हा सुद्धा एक प्रसंग आठवला की एक व्हिडिओ किल्प आहे एक मुलीला जॉब वरून येण्या करता उशीर होतो. ट्रेन मधून उतरते आणि चालत निघते घरी जाण्यासाठी रिक्षा भेटत नाही म्हणून चालते रस्त्यात काही गाड्या दिसतात तिथे मुले असतात त्यांना बघून ती घाबरते आणि आपल्या घराकडे जोरात चालू लागते. ती मुले गाडी चालू करून तिच्या मागे लागतात ती अजून जोरात चालू लागते घराच्या कडेला पोचते आणि पटकन गेट उघडून आता जाते आणि गेटात उभी राहून बघते तर ती मुले पुढे निघून जातात त्याच्या कपाळावर चंद्र कोर आणि गाडीवर महाराजांचा फोटो दिसतो *ती मुलगी बोलते जय शिवराय* अरे काय हा वेडेपणा काय हा विश्वस ज्याचा फोटो बघून माणूस स्वतःला सुरक्षित मानतो त्या काळी जनता स्वतःला किती सुरक्षित मनात असेल. त्या मुलींना गाडीत बसून दिले आणि त्या गाडी च्या बरोबर कल्पेश दादा आणि जगदीश दादा याना पाठवले. त्यांनी त्याच्या भावा पर्यत पोचवले. मग आम्ही पण निघालो मी केतन दादा आणि धीरज दादा याना स्टेशन वर पोचवले व आम्ही निघालो विजय दादा आमची वाट बघत होते त्याच्या बरोबर बोललो झालेला प्रसंग सांगितलं. घरी जायला १:३० वाजले होते.
आशा काही *अविस्मरणीय घटना झाल्या*
*तुम्ही देवावर विश्वस ठेवतात की नाही* हे मला माहिती नाही.
पण सांगा.
का? सरांनी मोहीम ९ तारखेला ठेवली, कोणत्याही प्रकारचे नियोजन नसताना रायगडकराणी पेब किल्ला निवडला, मोहीमेसाठी सोडई व भिवगड पण किल्ला होता, मोहिमेला जायला उशीर का झाला, मोहीम झाल्या नंतर संतोष दादा आणि सचिन दादा याच्या पाठी घरी का नाही गेलो, गुफा साफ का केली, ७ पाण्याच्या टाक्या का नाही सापडल्या, का नाही शिवमंदिराच्या कडे गेलो
या सगळ्या *का ?* चे उत्तर म्हणजे संयोग *जे नियतीत लिहले आहे ते होणारच* आपल्या परिवाराच्या हातातून त्याचे जीव वाचणार होते आणि ते आपण वाचवले आणि त्याच्यावर सुद्धा *काळ आला होता पण वेळ आली नव्हती* म्हणून ते सुद्धा वाचले.
सुनील सरांना एकाच सांगणे आहे की १४ विभागातील विभाग प्रमुखांना सक्तीने एक ४०० ते ५०० फूट इतकी रोप (दोरी) प्रत्येक मोहिमेला पाठी ठेवला सांगा. प्रसंग हा कोणावर आणि कसा येईल ते सांगू शकत नाही
*जय जिजाऊ, जय शिवराय*
*हर हर महादेव*
🚩⚔ *एक मावळा* ⚔🚩
*राजा शिवछत्रपती परिवाराचा*
✍ *अक्षय पुंडलिक पाटील* ✍
*७५१७३८३४७२ / ९६५७७६६३५२*